आमच्याविषयी

ग्रामपंचायत सवणस

आपले सहर्ष स्वागत करते.
ग्रामपंचायत सवणस हि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ग्रामपंचायत सवणस मध्ये मुळगाव व सवणस अशी दोन महसुली गावे आहेत . मुळगाव ,सडेवाडी, घोनसवनणेवाडी अश्या तीन वाड्या आहेत. गावामध्ये सर्व प्रकारची देवस्थाने असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रीतपणे येवून परंपरागत सण साजरे करतात. हे गाव खेड शहरापासून २४ कि.मी. अंतरावर आहे . गावात गणेशोउत्सव, दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान-बकरी ईद ई. सन साजरे केले जातात.

ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. सवणस हे शैक्षणिक, सामाजिक व व्यापारी दृष्ट्या प्रगत होत असून दोन्ही गावांची लोकसंख्या, संसाधनं व परंपरा एकत्र येऊन ही ग्रामपंचायत अधिक सशक्त होत आहे.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत